मुंबई | एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे ( Air India Airport Services Limited, AIASL) मॅनेजर ऑफ फायनान्स (Manager of Finance), ऑफिसर अकाउंट्स (Officer Accounts) आणि असिस्टंट ऑन अकाउंट्स (Assistant on Accounts) या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

इच्छुक उमेदवार एअर इंडियाचीअधिकृत वेबसाइट airindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी खाली नोटिफिकेशनची थेट लिंक देण्यात आली आहे.
Air India Recruitment: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रता निकष
मॅनेजर-फायनान्स
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातून चार्टर्ड अकाउंटंट किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातून कॉस्ट अकाउंटंट पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा सदस्य असणे आवश्यक आहे. संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ५० हजार रुपये इतका पगार दिला जाईल.

ऑफिसर अकाउंट्स
या पदासाठी उमेदवार इंटर चार्टर्ड अकाउंटंट / इंटर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी किंवा फायनान्समध्ये एमबीए किंवा समकक्ष पात्रता असणारा असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ४१ हजार ५०० रुपये इतका पगार दिला जाईल.

असिस्टंट अकाऊंट –
या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीधर (ऑनर्स) असावा. तसेच त्याच्याकडे संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १९ हजार ३५० रुपये इतका पगार दिला जाईल.

निवडले झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३१ मे २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना एअर इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे गरजेचे आहे.