मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि मूल्यांकन केंद्र, (DRDO-RAC) ने वैज्ञानिक पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अधिसूचना देखील जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी DRDO-RAC च्या अधिकृत साईट rac.gov.in वर 28 जून 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. संस्थेत 28 पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबवली जात आहे. 

शैक्षणिक पात्रता – 
विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार Detailed Notification या लिंकवर शैक्षणिक पात्रता तपासू शकतात

वयोमर्यादा : विविध वैज्ञानिक पदांसाठी उच्च वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे-
शास्त्रज्ञ ‘एफ’: 50 वर्षे.
शास्त्रज्ञ ‘डी’/’ई’: 45 वर्षे.
शास्त्रज्ञ ‘सी’ : 35 वर्षे.

अर्ज शुल्क
सामान्य, OBC आणि EWS पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100/. SC/ST/दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. (अर्ज फी नॉन-रिफंडेबल नॉन-हस्तांतरणीय आहे)