Categories: गुन्हे

कागल ब्रेकींग : २९ वर्षीय तरूणाचा भरदिवसा खून; शहरात तणाव

कागल | कागल मध्ये भरवस्तीत दिवसाढवळ्या एकाचा खून झाल्याने शहरात खळबळ उडालीय. अक्षय उर्फ मॅनर्स विनायक सोनुले (वय वर्ष २९) रा. महात्मा फुले वसाहत, असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महात्मा फुले वसाहतीतील सणगर गल्ली येथे लक्ष्मी मंदिर समोर दुचाकी वरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हा खून केल्याची माहिती मिळत आहे. अक्षय़ देखील बुलेट वरून येत असल्याचे सांगण्यात येतय. त्याच्या शरीरावर सत्तूराने सोळा वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती आहे. 

सध्या सगळीकडे कडक लॉकडाऊन असल्याने रस्ते सुनसान आहेत. याचाच फायदा घेत हल्लेखोरानी अक्षयचा खून केलाय. लक्ष्मी मंदिरासमोरून घराकडे जाणाऱ्या अक्षयला थांबवून त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकल्याचे समजते. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप १६ वार करण्यात आलेत. या हल्ल्यात अक्षय रक्तबंबाळ अवस्थेत जागीच कोसळल्याने दोन्ही हल्लेखोरानी मोटारसायकलवरून सांगावच्या दिशेने पलायन केल्याची माहिती आहे. जमलेल्या लोकांनी अक्षयला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच तो मयत पावला आहे.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक तिरूपती काकडे, करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर, कागलचे पो.नि. दत्तात्रय नाळे यांनी भेट दिलीय. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 

मयत – अक्षय सोनुले
Akshay Sonule Murder case
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: aksahy sonule murder case