एकदा रणबीर सिंग गायछाप जर्दा तंबाखू मळत बसलेला असतोय, चुना लावून मळलेला ईडा दाढतं ढकलणारच इतक्यात तिथं कंगना राणावत येते आणि रणबीरला म्हणते…
‘मित्रा रणबीर, माझ्या बाॅलीवुड बडी, सोड ही नशा! बघ, हे जग किती सुंदर आहे. चल माझ्या सोबत आणि या बाॅलीवुडचे सौंदर्य पहा, अच्छे दिन पहा’.
रणबीर थोडा वेळ विचार करतो आणि कंगनासोबत चालायला लागतो. काही अंतर पुढं गेल्यावर अयान मुखर्जी बसलेला दिसतो. तो १२०-३०० तंबाखू घातलेला मावा चोळत बसलेला असतोय. किमाव लावून रगडून काढलेला मावा तोंडात टाकणारच, तितक्यात त्याला पाहून कंगना म्हणते…
‘मित्रा अयान, माझ्या बाॅलीवुड बडी, सोड ही नशा! बघ हे जग किती सुंदर आहे. चल माझ्या सोबत आणि या बाॅलीवुडचे सौंदर्य पहा, अच्छे दिन पहा’.
अयानसुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि कंगनासोबत चालायला लागतो. काही अंतर पुढे गेल्यावर विकी कौशिक बसलेला दिसतो. तो सिगारेट पेटवणारच असतोय, तितक्यात त्याला पाहून कंगना म्हणते…
‘मित्रा विकी, माझ्या बाॅलीवुड बडी, सोड ही नशा! बघ हे जग किती सुंदर आहे. चल माझ्या सोबत आणि या बाॅलीवुडचे सौंदर्य पहा, अच्छे दिन पहा’.
विकीसुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि कंगनासोबत चालायला लागतो. काही अंतर पुढे गेल्यावर ह्रितिक रोशन बसलेला दिसतो. तो वोडक्याचा खंबा फोडून पेग भरतच असतोय, तितक्यात त्याला पाहून कंगना म्हणते…
‘मित्रा ऋतिक, माझ्या बाॅलीवुड बडी, सोड ही नशा! बघ हे जग किती सुंदर आहे. चल माझ्या सोबत आणि या बाॅलीवुडचे सौंदर्य पहा’.
ऋतिक त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि त्याच्या सहाबोटी हातावर पचकन थुंकून कंगनाच्या कानाखाली ७-८ वेळा सूर्यजाळ काढतो.
हे पाहून रणबीर, अयान, विकी दुःखी होतात. कष्टी स्वरात ऋतिकला म्हणतात, “अरे मित्रा, कंगना आपल्या भल्याचेच सांगतेय, मग तु का मारलेस तिला? नेपोटीझमवर बोलते म्हणून असा राग काढणे योग्य नाही.”
यावर लालभडक नाक-डोळे झालेला ऋतिक म्हणतो,
“हिच्यासोबत सर्वात जास्त दिवस मी काढलेत. आख्ख जग हिच्यासोबत फिरुन झालेय. ही भक्तीण जेव्हा-जेव्हा गांजा ओढते तेव्हा अशीच बोलते!”
– तुषार गायकवाड (लेखक राजकीय विश्लेषक असून वरील उपहासात्मक लेखन हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)