Categories: मनोरंजन

कंगणाकडून करण जोहरवर हल्लाबोल!

मुंबई | आपल्या ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कंगनाने एक ट्विट केले आहे. करण जोहर हा चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी असून अनेक लोकांचे जीवन उद्धवस्त करुन तो खुलेआम फिरत आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही काही अपेक्षा करु शकतो का? सगळे प्रकरण शांत झाल्यानंतर तो आणि त्याची गँग माझ्याकडेही येईल, असे कंगनाने म्हटले आहे.

या अगोदर अनेकदा करण जोहरवर तिने टीका केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणाली की, भारत सरकारला करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मी विनंती करते. मला त्याने उघडपणे धमकावले आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर त्याने मला इंडस्ट्री सोडण्यास सांगितले. सुशांतची कारकीर्द खराब करण्याची षडयंत्र रचले. कंगनाने आधीदेखील करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. करण जोहर फक्त स्टार किड्सला प्रोत्साहन देत त्यांना चित्रपटात काम देत असल्याचे तिने म्हटले आहे.

Lokshahi News