Categories: क्रीडा

‘‘मुलांनो, काहीही करा, पण क्रिकेटकडे वळू नका,’’ न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूची उद्विग्न प्रतिक्रिया

क्रिकेट वर्ल्ड कप।२०१९। विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने न्यूझीलंडला अष्टपैलू खेळाडू जिमी नीशाम खूप व्यथीत झाला आहे. विश्वचषक गमावल्याचे अतीव दु:ख झाल्याने त्याने ‘‘मुलांनो, काहीही करा, पण क्रिकेटकडे वळू नका,’’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Jimmy Neesham ‘‘मुलांनो कोणत्याही क्षेत्राकडे वळा. बेकरी खोला, कोणतेही काम करा. आयुष्य आनंदात घालवून ६०व्या वर्षी मरा. पण क्रिकेटकडे वळू नका,’’ असे म्हणटले आहे. विश्वचषक स्पर्धेतील तोंडचा घास हरवल्यानंतर न्यूझीलंडचा संघ निराशाग्रस्त झाला होता. बाकी खेळाडूंनी पराभवाचे दुःख काहीसे पचवले असले तरी नीशामला मात्र हा पराभव पचवणे अवघड जाताना दिसत आहे.

नीशामने या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना म्हणटले आहे, ‘‘मी प्रचंड निराश झालो आहे. पुढील दशकभर तरी मी विश्वचषकातील या अर्ध्या तासाच्या खेळाचा विचारही करू शकणार नाही. माझ्या विश्वविजेत्या इंग्लंड संघाला शुभेच्छा”. त्याचबरोबर नीशामने अंतिम सामन्यासाठी चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लंडनमध्ये हजेरी लावली, त्यांचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान, विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव हा पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळेच झाल्याचे जगभर चर्चिले जात आहे, त्यामुळे हरूनसुध्दा न्यूझीलंडच्याच खेळाडूंचा जगभर बोलबाला सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: Criket world cup 2019 Jimmy Neesham Kids Take up baking क्रिकेट विश्वचषक २०१९ विश्वकप २०१९