नवी दिल्ली | शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशिल केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे. यामुळे पात्रताधारक प्रत्येक शेतकऱ्यास ट्रॅक्टरचे मालक होता येणार आहे. शेतकऱ्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागू असलेल्या या योजनेला लोकांकडून ‘प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना’ म्हणून ओळखले जात असले तरी ही योजना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना आहे. या योजनेतेर्गंत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे. या योजनेच्या लाभ घेतल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कामे वेळेत पुर्ण होतील आणि शेतकऱ्याला त्यांची आर्थिक उन्नती साधण्यास हातभार लागेल असे सरकारचे म्हणणे आहे.
ही योजना केंद्रसरकारकडून राबवली जात असल्याने या योजनेला ‘पीएम किसान ट्रॅक्टर योजना’ देखील म्हटले जात आहे. काही राज्यातील राज्य सरकारे ही अशा योजनांमध्ये आपला वाटा उचलतात. योजना सर्व राज्यांमध्ये सुरू असून कृषि यांत्रिकरण उपअभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.
२०२०-२१ अंतर्गत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदान देय आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज स्विकारण्यात येत आहेत. अर्ज स्विकारलेनंतर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जेष्ठता क्रमवारी निश्चित करून उपलब्ध निधीच्या प्रमाणात पूर्वसंमती देण्यात येईल. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेच्या अनुदानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन सविस्तर माहिती घ्या
* लिंक एक
* लिंक दोन
* लिंक तीन
काय आहे योजना –
ट्रॅक्टर योजनेची पात्रता –
‘या’ कागदपत्रांची आवश्यकता –
जे शेतकरी या योजेनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्यांनी तहसील कार्यालयाच्या जन सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. यासाठी आपल्याला एक अर्ज भरावा लागेल. कृषी विभागाच्या पडताळणी नंतर बँकेद्वारे कर्ज दिले जाते. त्यानंतर ट्रॅक्टर कंपनी आपल्याला ट्रॅक्टर देते आणि अनुदानदेखील आपल्या बँक खात्यात जमा करते. (सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारे या योजनांमध्ये अनुदान देत नाहीत, अथवा काही कालावधीसाठी अशा योजना स्थगित करण्यात आल्या आहेत)
अनुदानासाठी हा तक्ता पहा, अथवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घ्या