Categories: Featured अर्थ/उद्योग कृषी

Kisan Vikas Patra देईल गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम; जाणून घ्या या सरकारी योजनेची माहिती

नवी दिल्ली। शेतकरी बंधूनो जर तुम्हाला आपली बचत दुप्पट करायची असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही योजना (Kisan Vikas Patra scheme) ही सर्वोत्तम आहे. सध्या दिवसेंदिवस वाढणारा खर्च आणि मर्यादित असलेले उत्पन्न यामुळे महिन्याचे बजेट नेहमीच कोलमडत असते. ही परिस्थीती बदलण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना फार फायदेशीर असून अल्प बचतीवर आधारलेली ही योजना सर्वसामान्यांसाठी फायदेशिर आहे. केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जात असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका नाही. यामुळे या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला निश्चितच चांगली रक्कम मिळते. या योजनेसाठी केंद्र सरकारनेच व्याजदर निश्चित केले आहेत. इंडिया पोस्टच्या वेबसाईटनुसार किसान विकास पत्र योजनेचा कालावधी आता १२४ महिन्यांचा अर्थात १० वर्ष ४ महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. सध्याचा या योजनेचा व्याजदर ६.९ टक्के आहे. 

किसान विकास पत्र पात्रता (Kisan Vikas Patra Eligibility)

  • अर्जदार एक प्रौढ असावा आणि तो भारतीय रहिवाशी असावा.
  • तो किसान विकास पत्र स्वत: च्या नावे किंवा अल्पवयीनच्या वतीने अर्ज करू शकतो.
  • ट्रस्ट देखील या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. एचयूएफ (हिंदू अविभाजित कुटुंब) आणि अनिवासी भारतीय केव्हीपीमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत.

किसान विकास पत्राचे फायदे (Benefits of Kisan Vikas Patra) 

  • गुंतवणुकीची लवचिकता – केव्हीपी मध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त रक्कमही ठेवू शकता. कमीत कमी १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करु शकता.
  • परताव्याची हमी  – ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत राबवली जाते. यामुळे परताव्याची हमी आपल्याला मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्यात कोणत्याच प्रकारचा धोका नाही.
  • गरज पडल्यास दुसऱ्या व्यक्तीच्या नावे किसान विकासपत्र ट्रान्सफर करता येते.
  • वारस नेमण्याची सुविधा उपलब्ध
  • जारी केल्याच्या तारखेपासून अडीच वर्षांनंतर प्रमाणपत्र एन्केश केले जाऊ शकते.

अर्ज कसा कराल (Kisan Vikas Patra: How to Apply) 

  • अर्ज करण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती आहेत, तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनही अर्ज करु शकता.
  • यासाठी आपल्या पोस्ट ऑफिसमधून केव्हीपी अर्ज फॉर्म किंवा फॉर्म-ए घ्यावा लागेल.
  • सर्व संबंधित तपशील भरा आणि पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करा.
  • जर एजंटमार्फत गुंतवणूक केली गेली असेल तर दुसरा फॉर्म भरावा आणि सबमिट करावा लागेल.
  • दोन्ही प्रकारचे अर्ज फॉर्म हे https://www.indiapost.gov.in/. या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
  • केवायसी प्रक्रियेसाठी आपल्याला आपल्या ओळखीच्या पुराव्यांची एक प्रत द्यावी लागेल. आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kisan viakas patra scheme Kisan vikas patra किसान विकास पत्र किसान विकास पत्र योजना अर्ज किसान विकास पत्र योजना माहिती किसान विकास पत्र योजनेचे लाभ किसान विकासपत्र दुप्पट रक्कम