Categories: कृषी बातम्या

PM किसान योजनेचा ‘सातवा’ हप्ता कधी येणार? कशी करायची घरबसल्या नोंदणी? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन समान हप्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रूपये जमा होत आहेत. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हप्त्यांचे पैसे वाटप केले असून देशातील जवळपास साडेदहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. 

PM Kisan योजनेत घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून नोंदणी कशी करायची, आधार अपडेट, नावातील चुका कशा दुरूस्त करायच्या हे जाणून घेण्यासाठी या बातमीच्या शेवटी सविस्तर माहिती दिली आहे.

आत्ता शेतकरी वर्गात पुढील हप्त्याची उत्सुकता असून PM किसान योजनेचा सातवा हप्ता कधी येणार याकडे देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाचवा आणि सहावा हप्ता लवकर दिल्याने आता सातवा हप्ताही लवकर मिळेल अशी शेतकरी वर्गाला आशा आहे. वर्षभरातील हप्त्यांचे नियोजन पाहता सातवा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाण्याची शक्यता आहे. शक्यतो डिसेंबर महिन्याच्या कालावधीत सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल असेही सांगितले जात असले तरी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता डिसेंबर ते मार्चपर्यंत केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पाठवले जातील. 

सध्या पीएम किसान योजनेचा गैरवापर करत काही राज्यांमध्ये बोगस लाभार्थ्यांनाही लाभ दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची पुनर्पडताळणी मोहिम देखील हाती घेतली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी देखील राज्य सरकारना आदेश देण्यात आले आहेत. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली असून शेतकरी स्वतःची नोंदणी स्वतः करू शकणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नवर स्वतःची नोंदणी स्वतः करता येणार आहे. 

 • अशी करा घरबसल्या मोबाईलवरून नोंदणी –
  • पीएम किसान वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘Farmers Corner’ निवडा.
  • ‘नवीन शेतकरी नोंदणी’वर क्लिक करा.
  • एक नवीन टॅब उघडली जाईल.
  • येथे आपला आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका, ‘Click here to continue’वर क्लिक करा’.
  • त्यानंतर आपल्या नोंदणीसाठी फॉर्म उघडेल.
  • याठिकाणी जमिनीची माहिती देण्यासाठी सर्वे नंबर, खाते नंबर, खसरा क्रमांक आणि जमिनीचे क्षेत्र याची माहिती भरा
  • यानंतर ‘Save’ वर क्लिक करा, अशा प्रकारे घरबसल्या तुमची तुमची नोंदणी पूर्ण करा.

फार्मर्स कॉर्नरवर शेतकऱ्यांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा –
नवीन नोंदणी – https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx
आधार अपडेट – https://pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx
लाभार्थी स्थिती – https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
लाभार्थी यादी – https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
स्वत: नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती – https://pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx
स्वतः नोंदणी केलेल्यांसाठी चुकांची दुरूस्ती – https://pmkisan.gov.in/SearchSelfRegisterfarmerDetails.aspx
किसान क्रेडीट कार्ड साठी नोंदणी फॉर्म – https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 24000 rupees pm kisan 6000 RUPEES PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance CACP Farmer loan get insurance Insurance Kisan credit card KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM kisan penssion scheme PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान क्रेडीट कार्ड किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान मानधन योजना पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना