Categories: गुन्हे

कोल्हापूर : दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यु

कोल्हापूर | रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात कोल्हापूरातील तरुणाचा मृत्यू झाला. आज (रविवार) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील केरली गावानजीक ही घटना घडली. आशिष महेश कुर्लेकर (वय ३८, रा. केवीज पार्क, नागाळा पार्क) असे या तरुणाचे नाव आहे. ज्येष्ठ पत्रकार महेश उर्फ काका कुर्लेकर यांचे ते पुत्र होते.

रत्नागिरीहून परतत असताना हा अपघात झाला. आशिष त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्त मित्र मिलिंद भोसले यांच्यासोबत दुचाकीवरून रत्नागिरीला गेले होते. रस्त्यातील खड्ड्यामुळे आशिष यांचा बळी गेला. दुचाकी खड्ड्यांमध्ये गेल्याने पाठीमागे बसलेल्या आशिष यांना हादरा बसला व ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बेशुद्धावस्थेतच त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आशिष यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

Team Lokshahi News