कोल्हापूर। पन्हाळा रोडवरील वाघबीळ घाटातून कार दरीत कोसळल्याने पाच जण जखमी झालेत. सुमारे ३० फूट खोल दरीत कार गेल्याने ही घटना घडलीय. जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. (medical insurance, car aacident, accidental insurance,)
जखमींची नावे अशी, बाबासाहेब आगलावे(वय ३०), आक्काताई दगडू पाटील (वय ४५, दोघे रा. आंबर्डे, शाहूवाडी), अमर आदित्य चव्हाण (१७), दिपाली आदित्य चव्हाण (३४), आदित्य भीमराव चव्हाण (३८, रा. साठरे बांबर, रत्नागिरी) आहेत. अपघाताची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.