कोल्हापूर | सैनिकी मुलींचे व सैनिकी मुलांचे वसतिगृह आवारात असलेल्या झाडांची/बगीच्याची देखभाल करण्याकरिता अशासकीय माळी पद भरण्यात येणार आहे. /यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज दि. २७ नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदिप ढोले यांनी केले आहे.
हे पद कंत्राटी पध्दतीचे व एकत्रित मानधनावर असून माजी सैनिकास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.