Categories: प्रशासकीय सामाजिक

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर

कोल्हापूर | प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनतेच्या सोयीसाठी शिबीर कार्यालयात अपॉइन्टमेंट घेण्यासाठी एकसूत्रता यावी यासाठी सर्व नागरीक / वाहनधारक यांना कळविण्यात येते की, माहे जानेवारी 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी डिसेंबर महिन्याच्या 26 तारखेस सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार असून संबंधित तालुक्याच्या ठिकाणासाठी 26 डिसेंबर रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.

जानेवारी 2021 या कालावधीतील शिबीर कार्यक्रम –
इचलकरंजी- सोमवार दि. 1,11,18 व 25 जानेवारी 2021. मंगळवार दि. 5,12 व 19 जानेवारी 2021. जयसिंगपूर- 6,13,20 व 27 जानेवारी 2021. गारगोटी- 8 व 29 जानेवारी 2021. मुरगूड- 13 व 27 जानेवारी 2021. राधानगरी- 7 व 21 जानेवारी 2021. गडहिंग्लज/आजरा- 1,8,15,22 व 29 जानेवारी 2021. वारणानगर- 14 व 28 जानेवारी 2021. वडगांव- 5 व 19 जानेवारी 2021. मलकापूर- 13 व 27 जानेवारी 2021. चंदगड- 2 व 16 जानेवारी 2021. गगनबावडा- 29 जानेवारी 2021

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: RTO Kolhapur