Categories: Featured आरोग्य सामाजिक

धक्कादायक: कोल्हापूरात आज तब्बल ५० हून अधिक कोरोनाबाधितांची भर..!

कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून आज तब्बल ५३ रूग्णांची भर पडली आहे. आज रात्री ८ वाजेपर्यंत ५१३ प्राप्त अहवालापैकी ५३ अहवाल पॉझिटिव्ह तर ४३२ निगेटिव्ह आहेत. यामध्ये (३ जणांचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह तर २५ अहवाल प्रलंबित आहेत.) आजअखेर जिल्ह्यात एकूण ३६१ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज रात्री ८ वाजेपर्यंत प्राप्त ५३ पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड- ९, गडहिंग्लज-२, करवीर-५,  शिरोळ-३, नगरपरिषद क्षेत्रातील -१७, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात-१६ इतर राज्य १ असा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण १२३६ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ८५० रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण २५ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३६१ इतकी आहे.

Team Lokshahi News