Categories: Featured आरोग्य सामाजिक

कोल्हापूर ब्रेकींग : चंदगड येथील कोरोनाबाधिताचा मृत्यु; दिवसभरात दोन बळी

कोल्हापूर | एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. आता गेलेला दुसरा बळी हा  चंदगड  येथील कोरोना बाधित व्यक्तीचा आहे. आज गुरूवार २५ जून रोजी त्यांचा मृत्यु झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा हा दहावा बळी आहे.

आज सकाळीच कोल्हापूर शहरातील एका सराफ व्यावसायिकाचा कोरोनाने मृत्यु झाला होता. तर आताच मिळालेल्या माहितीनुसार या नव्या कोरोना मृत्युची भर पडली आहे.

चंदगड मधील या रूग्णाचा सकाळी मृत्यु झाला असून त्यांच्या कोरोनाचे निदान दुपारी आलेल्या रिपोर्टवरून झाले आहे.  त्यामुळे कोरोना रिपोर्ट येण्याआधीच त्यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोनाची स्थिती नियंत्रणात वाटत असताना नव्याने आढळणारे रूग्ण आणि कोरोनाबाधितांचे मृत्यु यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.  

Team Lokshahi News