Categories: Featured आरोग्य

कोल्हापूरात कोरोनाचे आणखी ३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ!

कोल्हापूर। प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमामुळे जिल्हा कोरोना मुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करत असताना शनिवारी रात्री जिल्ह्यात आणखी ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे प्रशासनासह जिल्ह्यावासियांमध्ये खळबळ उडाली आहे. आजरा तालुक्यातील दोन तर चंदगड तालुक्यातील एकाचा यामध्ये समावेश आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोनामुक्‍त झाल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निश्‍वास सोडला होता. मात्र, शुक्रवारी नव्याने तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. शेंडा पार्क येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत त्यांची स्वॅब तपासणी झाली. आजरा येथील पुरूष व महिलेचा तर चंदगड तालुक्यातील एका पुरूषाचा यामध्ये समावेश आहे. या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आजरा व चंदगड केंद्रावरील आयसोलेशन कक्षात ठेवल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

आजरा व चंदगड येथील कोरोना केअर सेंटर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच येथील मार्गही सील करण्यात आला आहे. चंदगड व आजरा तालुक्याला लागून बेळगाव जिल्ह्याची हद्द आहे. तेथे कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागास विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात चंदगड तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या घशातील स्‍वॅब घेतले होते. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. पण चंदगड व आजरा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला अशी अफवा पसरली होती. आज मात्र प्रत्यक्षात कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ माजली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur news update