Categories: Featured आरोग्य सामाजिक

कोल्हापूरचे कोरोना मीटर फास्ट.. आज ‘इतक्या’ रूग्णांची भर!

कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून आज प्राप्त झालेल्या अहवालातून आणखी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत ३९८ प्राप्त अहवालापैकी ३८१ अहवाल निगेटिव्ह तर १६ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. यामध्ये एकाचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात आजअखेर एकूण १०२८ पॉझीटिव्हपैकी ७६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण २४२ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, तर एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 16 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड तालुक्यातील – 1, चंदगड तालुक्यातील – 1, हातकणंगले तालुक्यातील -1, करवीर तालुक्यातील -1 पन्हाळा तालुक्यातील -1, शिरोळ तालुक्यातील-1, नगरपरिषद क्षेत्रातील -6, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात -3  आणि रत्नागिरी जिल्ह्यातील -1 असा समावेश आहे. 

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 94, भुदरगड- 78, चंदगड- 118, गडहिंग्लज- 113, गगनबावडा- 7, हातकणंगले- 20, कागल- 58, करवीर- 37, पन्हाळा- 30, राधानगरी- 73, शाहूवाडी- 187, शिरोळ- 16, नगरपरिषद क्षेत्र- 113, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-62 असे एकूण 1006 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, सातारा-2, रत्नागिरी-1, कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1 आणि असे इतर जिल्हा व राज्यातील 22 असे मिळून एकूण 1028 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Team Lokshahi News