Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक थांबेना; आज ५० हून अधिक पॉझिटिव्हची भर!

कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक वाढतच असून आज नवीन ५७ रूग्णांची भर पडली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४९ प्राप्त अहवालापैकी ३९१ निगेटिव्ह तर १ अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण १३०९ पॉझीटिव्हपैकी ८५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एकाचा मृत्युही झाला असून एकूण मृत्युंची संख्या २६ झाली आहे. 

सध्या जिल्ह्यात एकूण ४२४ पॉझीटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली आहे. आजच्या ५७  पॉझीटिव्ह अहवालापैकी, गडहिंग्लज- ५,  हातकणंगले- १, करवीर- १४, पन्हाळा- ८, शाहूवाडी- १, शिरोळ- ३, नगरपरिषदक्षेत्र- १४, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ११ अशा रूग्णांचा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ९६, भुदरगड- ८०, चंदगड- १५४, गडहिंग्लज- १३२, गगनबावडा- ७, हातकणंगले- २७, कागल- ५९, करवीर- ८१, पन्हाळा- ५०, राधानगरी- ७५, शाहूवाडी- १९२, शिरोळ- २७, नगरपरिषद क्षेत्र- १७८, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १२३ असे एकूण १२८१ आणि जिल्हा व राज्यातील २८ अशा मिळून एकूण १३०९ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Team Lokshahi News