Categories: आरोग्य बातम्या सामाजिक

15 Oct. 2020 : कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 47 हजार 127 कोरोनाबाधितांची नोंद, पहा आजचा रिपोर्ट

कोल्हापूर | जिल्ह्यातील आजच्या कोरोनाबाधितांची संख्या ६९ इतकी असून आजअखेर ४७ हजार १२७ रूग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या ३ हजार ४०८ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत. जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा वेग कमी होत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला असून कोरोनाबाधितांच्या घटत्या संख्येमुळे ३ कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. 

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, आरटीपीसीआर आणि सीबीएनएटी चाचणीचे ६०० पैकी ५६१ निगेटिव्ह तर २० अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. (यातील १९ अहवाल नाकारण्यात आलेत) अॅन्टीजेन टेस्टींग चाचणीच्या १९९ अहवालापैकी १८१ निगेटिव्ह तर १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच खाजगी रूग्णालये आणि लॅबच्या १७५ चाचण्यापैकी १४४ निगेटिव्ह तर ३१ पॉझिटिव्ह आढळले आहेत.

  • आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त ६९ पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा २, चंदगड ५, गडहिंग्लज २, हातकणंगले १२, कागल ४, करवीर ६, पन्हाळा २, शिरोळ ४, नगरपरिषद क्षेत्र ६, कोल्हापूर महापालिका क्षेत्र १३ व इतर शहरे व राज्य १३ असा समावेश आहे.

सध्या कोरोनासंक्रमणाचा वेग कमी झाला असला तरी जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाने १ हजार ५८२ रूग्णांचा बळी घेतला आहे. सध्या अनेक लोक घरच्याघरीच कोरोनाचे उपचार घेत असल्याने देखील बाधित रूग्णाचा अधिकृत आकडा कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात देखील कोरोनासंक्रमण रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे फार गरजेचे आहे.

Team Lokshahi News