Categories: Featured आरोग्य सामाजिक

कोल्हापूर : जिल्ह्यात आढळले आणखी ५३६ कोरोनाबाधित, वाचा आजचा संपूर्ण रिपोर्ट

कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार ५३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण १५ हजार २७३ पॉझीटिव्हपैकी ७ हजार ५९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ७ हजार २५७ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, तर एकूण ४२० जणांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली आहे.

आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे १ हजार ६०७ प्राप्त अहवालापैकी १ हजार ३६२ निगेटिव्ह तर २३९ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (३ जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, ३ अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीच्या ६९४ प्राप्त अहवालापैकी ५५३ निगेटिव्ह तर १४१ पॉझीटिव्ह (६१ निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील १५६ पॉझीटिव्ह आलेत.

आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त ५३६ पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-३, भुदरगड-१५, चंदगड-८, गडहिंग्लज-१३, गगनबावडा-६, हातकणंगले-८६, कागल-९, करवीर-५६, पन्हाळा- ८, राधानगरी- १६, शाहूवाडी-१०, शिरोळ-२९, नगरपरिषद क्षेत्र-८०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१३९ व इतर शहरे व राज्य ५८ असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-२४९, भुदरगड- ३२४, चंदगड- ४६२, गडहिंग्लज- ३९२, गगनबावडा-३८, हातकणंगले- १६११, कागल-२७९, करवीर-१६४९, पन्हाळा-४८२, राधानगरी-३८९, शाहूवाडी-३९५, शिरोळ-७४३, नगरपरिषद क्षेत्र-३११३, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-४७५९ असे एकूण १४ हजार ८८५ आणि इतर जिल्हा व राज्यातील – ३८८ असे मिळून एकूण १५ हजार २७३ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात नोंद आहे.

Team Lokshahi News