Categories: आरोग्य

२४ मे २०२०। कोल्हापूर जिल्हा कोरोना रिपोर्ट

कोल्हापूर। जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आज रात्री 9 वाजता 593 प्राप्त अहवालापैकी 31 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 509 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 नाकारण्यात आले, प्रलंबित 50 व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 पॉझीटिव्ह रूग्ण आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 317 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये शाहूवाडीत सर्वाधिक 102 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज दिवसभरात आलेल्या 31 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा- 1, भुदरगड- 2, चंदगड- 7, कागल- 4, पन्हाळा- 1, राधानगरी- 5, शाहूवाडी- 7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 4 असा समावेश आहे.

  • तपासणीसाठी पाठवलेले नमुने (शासकीय) – १९३९२
  • निगेटीव्ह – १२७७२
  • पॉझिटिव्ह – ३१७
  • अहवाल अप्राप्त – ६२४१
  • रिपीट सॅंपल – १४
  • रिजेक्ट – ४८
  • तपासणीसाठी पाठवलेले नमुने (खाजगी) – ५९
  • निगेटीव्ह – ५९
  • पॉझिटिव्ह – ०
  • पॉझिटिव्ह रूग्ण स्थिती – ३१७
  • बरे झालेले – १४
  • शिल्लक रूग्ण – ३०१
  • मृत्यु – २
  • गंभीर – ४

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 16, भुदरगड- 35, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 3, कागल- 5, करवीर- 10, पन्हाळा- 16, राधानगरी- 47, शाहूवाडी- 102, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 313 आणि पुणे -1,  कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 317 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: kolhapur corona report 24 may 2020