Categories: Featured

कोल्हापूर कोरोना रिपोर्ट ४ ऑगस्ट २०२०

कोल्हापूर | आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1088 प्राप्त अहवालापैकी 643 निगेटिव्ह तर 331 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (100 अहवाल प्रलंबित, 3 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 11 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 293 प्राप्त अहवालापैकी 262 निगेटिव्ह, 31 पॉझीटिव्ह तर 20 निगेटिव्ह अहवाल आरटी-पीसीआरला पाठविण्यात आले. एकूण 362 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 7714 पॉझीटिव्हपैकी 3449 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4048 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 362 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- 14, भुदरगड- 56, चंदगड- 4, गडहिंग्लज-16, हातकणंगले- 58, कागल-3, करवीर- 9, पन्हाळा- 3, राधानगरी- 1, शिरोळ- 21, नगरपरिषद क्षेत्र- 69 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र-108 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-170, भुदरगड- 209, चंदगड- 390, गडहिंग्लज- 267, गगनबावडा- 16, हातकणंगले- 708, कागल- 152, करवीर- 842, पन्हाळा- 319, राधानगरी- 249, शाहूवाडी- 278, शिरोळ- 297, नगरपरिषद क्षेत्र- 1557, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2155 असे एकूण 7609 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 105 असे मिळून एकूण 7714 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 7714 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 3449 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 217 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4048 इतकी आहे.

Team Lokshahi News