Categories: आरोग्य बातम्या सामाजिक

५ ऑक्टोबर २०२० – कोल्हापूर जिल्हा कोरोना रिपोर्ट

कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख सध्या खाली आल्याने प्रशासन आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज (५ ऑक्टोबर) प्राप्त झालेल्या अहवालात एकूण १३३ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. 

पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा ३, चंदगड १०, गडहिंग्लज ८, गगनबावडा १ हातकणंगले १, कागल ९, करवीर ८, पन्हाळा ६, राधानगरी ४, शाहूवाडी ३, शिरोळ २, नगरपरिषद क्षेत्र २३, कोल्हापूर महापालिका क्षेत्र ३८ व इतर शहरे व राज्य १७ असा एकूण १३३ चा समावेश आहे.

आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे २९५ प्राप्त अहवालापैकी २३१ निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. (यातील ७ अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे २२८ प्राप्त अहवालापैकी २१५ निगेटिव्ह तर १३ पॉझीटिव्ह (७० निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये २९६ प्राप्त अहवालापैकी २३३ निगेटिव्ह तर ६३ पॉझीटिव्ह, असे एकूण 133 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण ४५ हजार ७२८ पॉझीटिव्हपैकी ३६ हजार ५०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर तर जिल्ह्यात एकूण ७ हजार ७२३ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत. तर एकूण १ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Team Lokshahi News