Categories: आरोग्य बातम्या सामाजिक

11 Oct. 2020 : कोल्हापूर जिल्ह्यात आज 109 कोरोनाबाधित रूग्णांची भर

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज आणखी खाली आल्याचे पहायला मिळाले. यामुळे सध्यातरी कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. आज मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात नवीन १०९ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. 

आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त, आरटीपीसीआर आणि सीबीएनएटी चाचणीचे ४१५ अहवाल प्राप्त झालेत. यापैकी ३७८ अहवाल निगेटिव्ह तर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अॅन्टीजेन टेस्टिंगचे १९५ प्राप्त अहवालापैकी १७७ निगेटिव्ह तर १८ पॉझिटिव्ह आणि खाजगी रूग्णालये/ लॅबमधून पाठवलेल्या २३० प्राप्त अहवालापैकी १७६ निगेटिव्ह तर ५४ पॉझिटिव्ह आले आहेत. असे सर्व मिळून १०९ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर ४६ हजार ८०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यापैकी ४० हजार ७७१ रूग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ४ हजार ४८७ रूग्णांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपचार सूरू आहेत. तर १ हजार ५५० रूग्णांचा बळी गेला आहे. 

आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह १०९ अहवालापैकी आजरा १, भुदरगड ५, चंदगड ३, गडहिंग्लज ६, गगनबावडा १, हातकणंगले ७, कागल १, करवीर १४, पन्हाळा १, राधानगरी १, शाहूवाडी ४, शिरोळ ४, नगरपरिषद क्षेत्र २२, कोल्हापूर महापालिका क्षेत्र २८ तसेच इतर शहर व राज्यातील ११ रूग्णांचा समावेश आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur corona upadate