Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख पुन्हा वाढला, आज २२ रूग्णांची भर!

कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून नव्याने २२ रूग्णांची भर पडल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचे जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न पाहता पुन्हा वाढणारा संसर्ग जिल्हावासियांच्यात भितीचे वातावरण निर्माण करणारा ठरत असल्याचे दिसू लागलय. 

नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये चंदगड तालुक्यातील ६, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, राधानगरी आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी २, करवीर तालुक्यातील १ आणि नगपरिषद क्षेत्रात ९ अशा २२ रूग्णांचा समावेश आहे. गेले काही दिवस कोरोनाचा आकडा पुन्हा वाढू लागला असून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी नव्याने जोर धरू लागली आहे. 

  • रात्री ८ वाजेपर्यंत ४०० प्राप्त अहवालापैकी ३६४ निगेटिव्ह तर २२ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यापूर्वी पाठविण्यात आलेले ६ अहवाल पॉझीटिव्ह तर ३ अहवाल नाकारण्यात आले आहे. ५ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९६३ पॉझीटिव्हपैकी ७४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण २०७ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
Team Lokshahi News