कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आलेख हळूहळू खाली येत असल्याने आरोग्ययंत्रणा आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज अखेर कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या ४६ हजार ३७७ रूग्णांपैकी ३८ हजार ५२२ जणांवर चांगले उपचार झालेत. त्यामुळे या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालापैकी आरटीपीसीआर आणि सीबीएनएटी चाचणीचे ८०१ अहवालापैकी ६७२ निगेटिव्ह तर १२९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अॅन्टीजेन चाचणीच्या २४८ अहवालापैकी २१७ निगेटिव्ह तर ३१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच खासगी रूग्णालये आणि लॅब मधील प्राप्त अहवालापैकी १०७ निगेटिव्ह तर ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांची एकूण संख्या विचारात घेता आज १९५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसत आहे.
आज जिल्ह्यात ११ रूग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने मृत्यु पावलेल्यांची एकूण संख्या १५२५ वर गेली आहे. तर सध्या ६ हजार ३३० रूग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.