Categories: आरोग्य बातम्या सामाजिक

#Corona Update : कोल्हापूर जिल्ह्यात आज १३२ नवीन रूग्णांची भर

कोल्हापूर | आज कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत १३२ ची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे १ हजार ५६५ अहवाल प्राप्त झालेत. यापैकी १ हजार ५३३ निगेटिव्ह तर ३१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अॅंटीजेन तपासणीच्या १९८ प्राप्त अहवालापैकी १७५ निगेटिव्ह तर २३ अहवाल पॉझिटिव्ह आणि खाजगी रूग्णालये/लॅब यांचेकडील ३४५ प्राप्त अहवालापैकी २६७ निगेटिव्ह व ७८ पॉझिटिव्ह असे एकूण १३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात आज आढळलेल्या १३२ रूग्णांमुळे बाधित रूग्णांची एकूण संख्या ४६ हजार ५०९ वर गेली आहे. यापैकी ३८ हजार ८१२ रूग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १ हजार ५३५ रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला असून ६ हजार १६२ रूग्ण उपचार घेत आहेत. आजच्या प्राप्त अहवालापैकी आजरा १, भुदरगड ६, चंदगड ८, गडहिंग्लज ८, हातकणंगले ८, कागल ४, करवीर ६, शाहूवाडी ४, शिरोळ ४, नगरपरिषद क्षेत्र ३०, व इतर शहरे व राज्यातील २० असे एकूण १३२ रूग्ण आढळले आहेत. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur news update