कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे १२२ रूग्ण; ४१ कोव्हिड केअर सेंटरची स्थापना, ७२५३ बेडचे नियोजन

कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यात आज नव्याने ३९ रूग्णाची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२२ वर गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कालपर्यंत रूग्णांची संख्या ८३ वर होती. त्यात ही भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असताना प्रशासनाचा गोंधळ मात्र सुरूच आहे. तर गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या स्वॅब पैकी १५०० जणांचे रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याचे समजत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

आज सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटानी मिळालेल्या आकडेवारी नुसार ३९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. तर काल कोरोनाचे १०१ रूग्ण असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळालाय. कालची आकडेवारी ८३ असल्याचे स्पष्ट झालंय. आता सापडलेल्या रूग्णांमध्ये आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथील ३ तर भादवन येथील एका रूग्णाचा समावेश आहे. सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे अद्याप कोल्हापूरचा समावेश ऑरेंज झोनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्याप तरी कडक आणि सक्तीच्या नियमांचा रेड झोन कोल्हापूरच्या वाट्याला आलेला नाही.

जिल्ह्यात मुंबई, पुणे, सोलापूर तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांच्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत ४१ कोव्हिड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून यामध्ये रूग्णसेवेसाठी पहिल्या टप्प्यात ३ हजार १४२ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यात ४ हजार १११ बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली आहे. जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या ४१ कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून सुमारे ७ हजार २५३ बेड तीन टप्प्यामध्ये आवश्यकतेनुसार तयार करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ३ हजार १४२ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. ४ कोव्हिड केअर सेंटरमधून ओपीडी सुरू झाल्याचेही ते म्हणाले.

डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन टप्प्यात २ हजार ६८४ बेड निर्माण तयार करण्याचे नियोजन असून आतापर्यंत १ हजार ८० बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ३० टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात ३० टक्के बेड तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच डेडीकेटेड कोव्हिड केअर सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यामध्ये ३० टक्के, तिसऱ्या टप्प्यामध्ये ३० टक्के असे एकूण २ हजार ६८४ बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ८० बेड तयार झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत “आयुष” प्रणालीव्दारे जिल्ह्यातील ५० किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांना प्रतिबंधात्मक व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संशमनी वटी या आयुर्वेदिक आणि Arsenium Album ३० ही  होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ८६ हजार ५४८ इतर बाधित शहरातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व नोंद करण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २२ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून आतापर्यंत ६१ हजार ८८२ तपासणी करण्यात आल्या. जिल्ह्यात येणाऱ्यांची थर्मल स्क्रिनींगव्दारे तपासणी करण्यात येत असून १ हजार ७६१ प्रवाशांना घरी अलगीकरण व १ हजार ८३ प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळा बळकटीकरणावर भर दिला असून संशयीत रूग्णांची तात्काळ तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक RT-PCR and CB-NAAT मशिन उपलब्ध झाल्यामुळे तात्काळ निदान होत आहे. यापूर्वी सीपीआर येथे स्वॅब नमुने सुविधा होती. आता तालुकास्तरावर १५ ठिकाणी स्वॅब नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचेही डॉ. साळे यांनी सांगितले आहे.

This post was last modified on May 19, 2020 6:43 PM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020