Categories: Featured

कोल्हापूर कोरोना रिपोर्ट : आज दिवसभरात ७०२ पॉझिटिव्ह, १२ मृत्युमुखी

कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज तब्बल ७०२ रूग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता ८ हजार ४१६ वर गेली आहे. दरम्यान आज कोल्हापूरात १२ रूग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात एकूण मृत्युंची संख्या २२९ वर पोहचलीय. 

जिल्ह्यात आजअखेर एकूण 8416 पॉझीटिव्हपैकी 3611 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4576 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 702 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- 16, भुदरगड- 35, चंदगड- 12, गडहिंग्लज-7, गगनबावडा-12, हातकणंगले- 70, कागल-1, करवीर- 61, पन्हाळा- 12, राधानगरी- 47, शाहूवाडी- 46, शिरोळ- 45, नगरपरिषद क्षेत्र- 140, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-188 व इतर जिल्हा व राज्यातील – 10 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-186, भुदरगड- 244, चंदगड- 402, गडहिंग्लज- 274, गगनबावडा- 28, हातकणंगले- 778, कागल- 153, करवीर- 903, पन्हाळा- 331, राधानगरी- 296, शाहूवाडी- 324, शिरोळ- 342, नगरपरिषद क्षेत्र- 1697, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2343 असे एकूण 8301 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 115 असे मिळून एकूण 8416 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 8416 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 3611 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 229 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4576 इतकी आहे.

Team Lokshahi News