Categories: कृषी बातम्या सामाजिक हवामान

कोल्हापूर : मागील वर्षीच्या महापूरात नुकसान झालयं? मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात मागील वर्षी (जुलै, ऑगस्ट २०१९) आलेल्या पुरामुळे लाखो नागरिकांचे नुकसान झाले. यामध्ये कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील नुकसानग्रस्तांची संख्या अधिक होती. या सर्वांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई संदर्भात अनुदान देण्याचे सरकारने घोषित केले होते. त्यानुसार पंचनामे करून झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान नुकसानग्रस्तांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांसाठी प्रशासनाच्या वतीने खालील संदेश देण्यात आलेला आहे. 

“शहर व करवीर तालुक्यामध्ये माहे जुलै व ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे बाधित लाभार्थ्यांना सानुग्रह, घरपडझड, शेती नुकसानीचे व व्यावसायीक नुकसान अनुदान तहसिल कार्यालय करवीर यांच्याकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर ICICI बँकेमार्फत वर्ग करण्यात आले आहे. अद्यापही ज्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम तांत्रिक कारणामुळे जमा झालेली नाही, त्या लाभार्थ्यांनी बँक पासबुक भरुन त्यावर NEFT FROM TAHSILDAR या एंट्रीची पडताळणी करुन पासबुकसह तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.”

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: flood in Kolhapur Kolhapur august flood kolhapur flood kolhapur flood 2019 Kolhapur mahapur 2019 panchganga mahapur