Categories: Featured

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..!

कोल्हापूरधरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील काही राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली आहे.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे, वडणगे राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने रामा 204 रत्नागिरी कोल्हापूर हायवे मार्गे वाहतूक सुरू.
कागल तालुक्यातील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु, सुळकूड कोगनोळी रस्त्यावर पाणी आल्याने रामा 4 कोगनोळी मार्गे वाहतूक सुरू.  
पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्ता मार्गे वाहतूक सुरू.

  • राधानगरी अपटेड – धरणाचे चार नंबरचे गेट उघडले असून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
  • कासारी नदीला पाणी आल्याने पाल, मरळे, इजोली, सावर्डी, बर्की या गावांचा संपर्क तुटला
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Kolhapur rain