Categories: Featured सामाजिक

कोल्हापूर : तुकाराम माळी मानाच्या गणपतीचे यंदा ‘या’ पध्दतीने विसर्जन

कोल्हापूर |  प्रथम मानाचा गणपती असणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचे कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक, मान्यवरांची गर्दी आणि वाद्यांच्या गजराला फाटा देत साध्यापध्दतीने हा विसर्जन सोहळा पार पडला. साठमारी चौक येथे ठेवण्यात आलेल्या कुंडात हे विसर्जन झाले. यावेळी महापौर निलोफर आजरेकरर, आयुक्त डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी हे उपस्थित होते. 

दरवर्षी कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणूकीची सुरवात तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीने होते. त्याचबरोबर मिरवणुकांमध्ये मंडळांचे विविध सामाजिक चित्ररथ, पालख्या, विविध देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. त्यामुळे कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणुक सर्वत्र उत्सुकतेचा विषय असते. परंतु यंदा कोरोनामुळे या सगळ्याला पूर्ण विराम देण्यात आला असून साध्या पध्दतीने गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. 

Team Lokshahi News