Categories: Featured

कोल्हापूर-गारगोटी एसटीचा भीषण अपघात

कोल्हापूर । कोल्हापूर-गारगोटी मार्गावर निगवे खालसा फाट्यानजीक एसटी आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रात्री साडे नऊ च्या सुमारास हा अपघात झाला असून एसटी गारगोटी कोल्हापूर गारगोटी मार्गावरची आहे. अपघातग्रस्त एसटीला बसलेली धडक जबरदस्त असून एसटीची एक बाजू चक्काचूर झाली आहे. गाडीत एकूण २२ प्रवासी होते. यापैकी ११ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात दत्तात्रय तुकाराम पाटील (वय ५२, रा. निगवे खालसा, ता. करवीर) ठार झाले आहेत. मृत दत्ताराम पाटील यांच्या चुलतीचं १२ दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या अस्थी घेऊन ते पंढरपूरला चालले होते. यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातलाय.

अपघातात, बसचालक विनायक महिपती मेंगाणे (वय ३२, रा. शेळेवाडी, राधानगरी), साताप्पा महादेव लोकरे (६०, रा. कळंबा), पद्माकर झारीचंद कारमोरे (रा. बार्शी, सोलापूर), गुणवंत कारभारी मुंडे (रा. मालेगाव, बार्शी), गौतम बाळू कांबळे (रा. विचारे माळ, कोल्हापूर), बळवंत एम. पाटील (५२, रा. निगवे खालसा), लता अरविंद तानवडे (४५), अरविंद महिपती तानवडे (५०), वैषाली बाजीराव तानवडे (३५), बाजीराव महिपती तानवडे (४२, रा. माळवे खुर्द, कागल), राहुल पोपट लोंढे (४५, रा. भोसरी) हे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: accidental insurance body damages insurance bus accident insurance Bus accident kolhapur gargoti buy online insurance car insurance Insurance personal insurance third pary accident insurance vehicle insurance