Categories: कृषी

दुर्गम तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करा – जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील

कोल्हापूर | जिल्ह्याच्या दुर्गम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करावे असे, आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०५ व्या जयंती निमित्ताने कृषीदिन कार्यक्रम शेतकऱ्यांच्या बांधावर आयोजित करण्यात आला होता. 

१ ते ७ जुलै २०२० या कालावधीमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती करवीर यांचे सयुंक्त विद्यमाने जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीत कोगे ता. करवीर येथील तानाजी लहू मोरे यांच्या बांधावर संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, करवीरच्या पंचायत समिती सभापती आश्विनी धोत्रे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुराडे, कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे , कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह करवीर तालुका आणि जिल्हास्तरावरील कृषी विभागाचे अधिकारी आणि परिसरातील प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष पाटील यांनी कृषी विभागाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करुन प्रगतीशील शेतक-यांसह सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आणि प्रगतीशील शेतक-यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी कृषी विकास अधिकारी   चंद्रकात सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात कृषी दिनाचे महत्व आणि चालू वर्षात कार्यक्रमाची रुपरेषा कशी असणार आहे याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी कृषीविषयक कार्याची महती विषद केली तसेच जिल्हयातील पीकपध्दती, शेतकऱ्यांची जमीनधारणा आणि विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये कृषी विभागाने केलेल्या कामाबद्दल उपस्थिताना मार्गदर्शन  केले. तर कृषी विद्यावेत्ता अशोक पिसाळ यांनी सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता, बीजप्रक्रियाइ. नुसार पिकाची लागवड पध्दती याबाबतीत मार्गदर्शन केले. 

यावेळी प्रगतीशील शेतकरी तानाजी मोरे यांनी कृषी विभागातील योजनांबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वांना मागदर्शन केले. तसेच डॉक्टर्स डे निमित्त डॉ. ज्योती मोरे यांचाही सत्कार करण्यात आला व त्यांनी तयार केलेल्या आर्सेनिक अल्बम या औषधाचे वाटप करण्यात आले. श्रीमती फरांदे यांनी आभार मानले.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: krishi din 2020