कोल्हापूर | जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनची मुदत २६ जूलै रोजी संपत असून नव्याने लॉकडाऊन वाढणार का याची आज कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता होती. याबाबत जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांची आज रात्री चार बैठक सुरू होती. या बैठकीत झालेला निर्णय उद्या (२६ जुलै) रविवारी दुपारी जाहीर केला जाणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केलय.
सोमवार पासून लॉकडाऊन वाढवला जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान लॉकडाऊन मध्ये शिथिलता देऊन काही नियम आणि निर्बंध वाढवून काम करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत उद्या रविवारी अधिकृत माहिती मिळाल्यानंतर अपडेट केले जाईल.