Categories: राजकीय सामाजिक

कोल्हापूर ब्रेकिंग : मराठा आरक्षण प्रकरणी सरकारचे श्राद्ध घालण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात

कोल्हापूर | मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरात सरकारचे श्राद्ध घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. दरम्यान आंदोलकांना ताब्यात घेता आंदोलक आणि पोलिस यांच्यात चांगलीच झटापट आणि शाब्दिक चकमक पहायला मिळाली.

मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन १२ दिवस उलटल्यानंतरही सरकारकडून काहीच हालचाली होत नसल्याने सरकारचे श्राध्द घालण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.

Team Lokshahi News