Categories: राजकीय सामाजिक

कोल्हापूर : मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला प्रारंभ, परिषदेत १५ ठरावांना मंजूरी

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; कोल्हापूर मधील गोलमेज परिषदेत निर्णय

कोल्हापूर | सर्वोच्य न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या हेतूने आज कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या गोलमेज परिषदेत विविध पंधरा ठराव मंजूर करण्यात आलेत. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवून समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या चालू शैक्षणिक वर्षातील फीचा परतावा शासनाकडून मिळावा, केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, महाराष्ट्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती मिळावी, शिवस्मारकाचे काम तातडीने व्हावे, राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ करावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना त्वरित शिक्षा मिळावी, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये वसतिगृहे व्हावीत, आदी ठराव परिषदेने मंजूर केले आहेत.

विजयसिंह महाडिक यांनी ठरावांचे वाचन केले तर भरत पाटील यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हे ठराव शासनाला पाठवले जाणार आहेत. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांच्यासह राज्यातील पन्नासहून अधिक संघटनांचे पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, “एक मराठा- लाख मराठा’, “आरक्षण आमच्या हक्काचं’ अशा घोषणा देतच परिषदेला प्रारंभ झाला. 

दरम्यान, येथील रावजी मंगल कार्यालयात परिषदेला सुरवात झाली असून, परिषदेत मराठा समाजातील विविध प्रश्‍न आणि आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: maratha aarkshan golmej parishad