Categories: राजकीय

कोल्हापूर महापालिका निवडणूक; ११ प्रभागांचे आरक्षण जाहीर

कोल्हापूर | महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीस आज सकाळी सुरवात झाली. सकाळी अकरापासून सुरू झालेल्या आरक्षण सोडतीत पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत काढण्यात आली.

एकूण ११ प्रभागांपैकी पाच प्रभाग पुरूषांसाठी तर सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडतीचे कामकाज सुरू आहे. आरक्षण सोडतीची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांबरोबर कार्यकर्त्यांनाही आहे. त्यामुळे परिसरात इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Kolhapur Municipal Election Reservation 2020