Categories: Featured प्रशासकीय

पेट्रोल-डिझेल पंपाबाबतीत पसरलेल्या अफवा खोट्या; पंप सुरूच राहणार – कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

कोल्हापूर। पेट्रोल-डिझेल यांचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असल्याने पेट्रोल पंप बंद होणार नाहीत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे.

कोरोना विषाणूमुळे घाबरून जाऊन पेट्रोल पंप बंद होण्याच्या भीतीने शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिक गर्दी करीत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत आहे. पेट्रोल-डिझेल या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असल्यामुळे पेट्रोल पंप बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अथवा त्यांचा तुटवडाही भासण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी याबाबतच्या कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व पेट्रोल-डिझेलचा अनावश्यक साठा करण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी केले आहे.

Team Lokshahi News