कोल्हापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी एक वाजे पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

उद्योजक जाधव यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉलच्या माध्यमातून थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दीड वर्षात त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते पूर्णत बरे झाले होते. परंतु काही दिवसांपासून त्यांना पून्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सूरू असतानाच त्यांचे निधन झाले.