Categories: Featured कृषी हवामान

Kolhapur: जिल्ह्यातील ३२ बंधारे पाण्याखाली; ताम्रपर्णी घटप्रभेला पूर

कोल्हापूर | जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणांसहित नद्यांमधील पाणीपातळी वाढली आहे. गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा या भागातील घाटमाथा आणि धरण क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

  • पंचगंगेची पाणीपातळी २३ फूटांवर

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ११०.९९  दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ११०० तर कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि  खडक कोगे, वेदगंगा नदीवरील मसवे, शेळोली, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, निलजी व ऐनापूर, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव व कानडेसावर्डे असे एकूण २८ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३७. २८  टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ७६.२५२ इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी ४४.६३ दलघमी, वारणा ४७२.९५ दलघमी, दूधगंगा ३६१.३२ दलघमी, कासारी ३८.०१दलघमी, कडवी ३०.३५ दलघमी, कुंभी ३९.६१ दलघमी, पाटगाव ५२.७० दलघमी, चिकोत्रा १८.३० दलघमी, चित्री १८.३९ दलघमी, जंगमहट्टी १३.७० दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा)  ६.०६ दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम २१.५ फूट, सुर्वे २२ फूट, रुई ५०.९ फूट,  इचलकरंजी ४८ फूट, तेरवाड ४२ फूट, शिरोळ ३३.६ फूट, नृसिंहवाडी २९ फूट, राजापूर १८.६ फूट, सांगली ९ फूट, अंकली १०.१० फूट अशी आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: radhanagari dam