Categories: हवामान

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 73 बंधारे पाण्याखाली

नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, जिल्ह्यात पूरस्थिती

कोल्हापूर | जिल्ह्याच्या धरणक्षेत्रासह सर्वत्रच पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील तब्बल ७३ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. यामुळे काही गावांचा पूर्णत तर काही गावांचा अंशत संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर काही राज्यमार्गांवर देखील पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्रीत तब्बल दहा फूटानी वाढल्याने कोल्हापूर करांची चिंता वाढलीय. सध्या पंचगंगंगेची पाणीपातळी ३२ फूटांवर आहे. तर इशारा पातळी ३९ फूट आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने आज पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासह राज्यात सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Team Lokshahi News