Categories: हवामान

गगनबावडा तालुक्यात 24 तासात विक्रमी पाऊस; राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 6922 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर | जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 317 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 38.38 (267.25), शिरोळ- 25.86 (225.14), पन्हाळा- 88.29 (752.57), शाहूवाडी- 64 (1011.83), राधानगरी- 102.50 (1055.83), गगनबावडा-317 (2921), करवीर- 70.27 (565.27), कागल- 90.29 (753.29), गडहिंग्लज- 55 (536.57), भुदरगड-72.40 (856.60), आजरा- 116 (1193.75), चंदगड- 155 (1172.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

धरणसाठा
62 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 6922 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 199.89 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर अलमट्टी धरणातून 6922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.*

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे, वारणा नदीवरील-चिंचोली व माणगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज व सांगरूळ, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली व शेलोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डी व अडकूर, तुळशी नदीवरील- घुंगुरवाडी, कांचनवाडी, बाचणी, आरे व बीड असे एकूण 62 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 60.29 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 90.864 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 61.33 दलघमी, वारणा 745.42 दलघमी, दूधगंगा 528.83 दलघमी, कासारी 62.15 दलघमी, कडवी 48.78 दलघमी, कुंभी 62.52 दलघमी, पाटगाव 81.77 दलघमी, चिकोत्रा 23.93 दलघमी, चित्री 34.35 दलघमी, जंगमहट्टी 28.97 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 31 फूट, सुर्वे 28.4 फूट, रुई 56.8 फूट, इचलकरंजी 52.6 फूट, तेरवाड 43.6 फूट, शिरोळ 34.6 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 18.3 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 12.6 फूट अशी आहे.
00000

Team Lokshahi News