Categories: Featured

राशिवडे ग्रामपंचायतीसमोर थरार, पत्नी आणि मेव्हण्याचा खून

कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे कौटुंबिक वादातून दोघांचा अमानुष खून झाल्याची घटना घडलीय. या घटनेत पत्नी मंजाबाई कावणेकर (वय 42) आणि मेहुणा केरबा हिवरा आप्पा एडके (वय 40) राहणार कोथळी तालुका करवीर या दोघांचा राशिवडे तालुका राधानगरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोयत्याने भोसकून अमानुष खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. हल्लेखोर पती सदाशिव खानू कावनेकर वय (52) राहणार राशिवडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरच झालेल्या या घटनेमुळे राशिवडे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. घटनास्थळी ग्रामस्थांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हल्ल्यात ठार झालेली मंजाबाई कावणेकर ही ग्रामपंचायतीची माजी सदस्य आहे. पती सदाशिव व मंजा बाई यांच्यात कौटुंबिक कलहातून चार-पाच वर्षापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. 

मेंढपाळ असलेल्या पतीने पत्नी विरूध्द तर पत्नीने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तसेच न्यायालयात परस्परविरोधी दावे दाखल केले आहेत. दोघांनी तंटामुक्त समितीकडेही धाव घेतली होती. मात्र त्यांच्यात समेट झाला नव्हता चार दिवसांपूर्वी सदाशिव व मेहुणा केरबा यांच्यात मोठा वाद झाला होता. केरबा व त्याचे साथीदार सदाशिवला मारहाण करण्यासाठी राशिवडेला गेले होते. मात्र तेथील काही स्थानिक लोकांनी वाद मिटवला, पण सूडाने पेटलेल्या सदाशिवने पत्नी आणि मेव्हण्याला मारण्याची धमकी दिली होती. 

आज मंगळवारी सकाळी मंदाबाई आणि केरबा राशिवडे येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयाकडे आल्याची माहिती सदाशिवला मिळाली त्याने कोयत्याने ग्रामपंचायतीसमोर भरचौकात त्यांच्यावर वार करून अमानुष खून केला. घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

Team Lokshahi News