कोल्हापूर | जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवार दिनांक १५ डिसेंबर रोजी काढण्यात येणार होती. ती आता १५ जानेवारी २०२१ नंतर काढली जाणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.
२०२० ते २०२५ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसधारण स्त्री सरपंच पदासाठी मंगळवार, १५ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार होती. परंतु, आता ही सोडत ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.