Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर : शिवसेनेच्या ‘या’ खासदारांना कोरोना

कोल्हापूर | राज्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यातच आता कोल्हापूर शिवसेनचे खासदार संजय मंडलिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. खा. मंडलिक यांनी फेसबुक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.

मंडलिक यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये, माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या कामाकरिता माझ्या कार्यालयीन नंबर 99 22 99 80 99 या नंबर वर संपर्क साधावा असे सांगितले आहे. 

दरम्यान, खासदार मंडलिक यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा विरेंद्र मंडलिक आणि पत्नी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.

Team Lokshahi News