कोल्हापूर | जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने ९४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीची पाणीपातळी ३७ फूट ७ इंचावर पोहचली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सर्वच नद्यांना पूर आल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गही बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वहातूक वळवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाण्याचा विसर्ग –
जिल्ह्यातील प्रमुख बंधाऱ्यांची पाणी पातळी –
महत्वाचे –
जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 130.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले – 25.25 (431.63), शिरोळ – 20.71 (354), पन्हाळा – 69.43 (1218.57), शाहूवाडी – 73 (1515), राधानगरी – 89 (1652.83), गगनबावडा -124.50 (4133), करवीर – 67.55 (891.27), कागल – 61.71 (1096.86), गडहिंग्लज – 60.43 (777.43), भुदरगड -94.40 (1267.40), आजरा – 116.25 (1798.75), चंदगड – 130.83 (1866.17) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.