Categories: सामाजिक

एशियन पेंट्सच्या ‘या’ लज्जास्पद कृत्याचा तीव्र निषेध – आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर | कोल्हापूरचा अपमान करणाऱ्या एशियन पेंटच्या जाहिरातवरून कोल्हापूर काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील आक्रमक झाले आहेत. एशियन पेंटने चुकीच्या पद्धतीने जाहीरात दाखवून समस्त कोल्हापूरवासियांची अस्मिता हिनवल्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे एशियन पेंटने तात्काळ ही जाहिरात मागे घेऊन संपूर्ण कोल्हापूरवासीयांची माफी मागावी, अशी मागणी ऋतुराज पाटील यांनी केली आहे.

प्रत्येक शहराला स्वतःची अशी अनोखी ओळख आणि परंपरा, मूल्य असतात. स्वतःचे व्यावसायिक उत्पादन वाढविण्यासाठी कोल्हापूर शहराची परदेशी शहराशी तुलना करणे निंदनीय आहे. एशियन पेंट्सच्या या लज्जास्पद कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यामुळे याबाबत तात्काळ जाहिरात मागे घेऊन कोल्हापूरची माफी मागावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर इतर चॅनेलनी ही जाहिरात दाखवू नये अशी विनंतीसुद्धा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

काय आहे एशियन पेंटसची वादग्रस्त जाहिरात

जाहिरातीत शाळकरी मुलं मित्राच्या घराच्या रंगाचं कौतुक करत, ते ज्या मित्राचं घर आहे त्या मित्राला आता तू सुट्टीत विदेशात जाणार ना? असा प्रश्न विचारतात. त्यावर तो लहानगा सिंगापूरला जाणार अशी बढाई मारताना दाखवण्यात आलंय. तितक्यात मुलाचे वडील घरात येऊन कोल्हापूरची तिकिटं मिळाली असून सुट्टीत कोल्हापूरला जाणार असल्याचं सांगतात. यावर सर्व मुलं बढाई मारणाऱ्या लहानग्यावर हसतात. एशियन पेंटने रंगाची जाहिरात करताना कोल्हापूर आणि सिंगापूरची तुलना केली आहे.

Team Lokshahi News