Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर : ‘या’ युवा आमदारांना कोरोनाची लागण

कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांसोबत नेतेमंडळीना देखील कोरोनाची बाधा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील युवा आमदारांनाच कोरोनाची बाधा झाल्याने आता खळबळ उडाली आहे. आपल्या ट्विटर हॅंडलवरून त्यांनी ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. 

कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती

Team Lokshahi News