Categories: Featured

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना केले ‘हे’ आवाहन

कोल्हापूर | मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीच आज सकाळी रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सगळीकडे खळबळ उडालीय. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच आपल्या वॉट्सअॅप स्टेट्सद्वारे दिली असून संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचा तसेच टेस्ट करून घेण्याच्या सूचना आणि आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. सोमवारी जिल्हापरिषदेत सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी बैठक झाली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर दिवसभरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनेक लोक भेटण्यासाठी आले होते. तसेच त्यांनी काही ठिकाणी मुलाखतीही दिल्या असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्ववभूमीवर सर्वांच्या रॅपिड टेस्ट घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेला आहे.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या स्टेटस मध्ये कोरोना बाबतचा उल्लेख केला आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाईन होणार असून कार्यालयीन कामकाज नियमितपणे होणार असल्याचेही त्यांनी येथे स्पष्ट केले आहे.

Team Lokshahi News